परिणाम[संपादन]
सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे.
हिमनद्यांचे वितळणे[संपादन]
इ.स. १९६० च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[७] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स. १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्णाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[८].[९]हिमालय, आल्प्स, आन्देस व रॉकि या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.
हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१०]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळण्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलँड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलँडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [३] व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस अँजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलँड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांम्धील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार.
हवामानातील बदल[संपादन]
हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले/ अनुआहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[११]. युरोप व अमेरिकेत देखिल पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[३]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखिल पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत.
हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे.वाळवटांचीही व्याप्ति वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे.
महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे अत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाह व उत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यते वर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
No comments:
Post a Comment